Monday, March 5, 2012

UNION

  ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युनियन ग्रुप सी चे द्विवर्षिक प्रांतिय अधिवेशन बडनेरा येथे १९ फेब्रुवारी पासून
अमरावती(प्रतिंनिधी ):- ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युनियन ग्रुप सी च्या महाराष्ट्र (गोव्यासह)मंडळाचे ३५ वे द्विवर्षिक अधिवेशन दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी श्रीराम भवन ,रेस्ट हाऊस रोड ,नवी वस्ती  बडनेरा येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे .
                             आयोजित अधिवेशनाचे उदघाटन ऑल  इंडिया फेडरेशन ऑफ कॉलेज अँड टीचर्स ऑरगणायजेशन ,मुंबई चे अध्यक्ष प्रा .किशोर ठेकेदत्त यांचे हस्ते,संघटनेचे प्रांतिय अध्यक्ष कों एल एम परिमल यांचे अध्यक्षतेत होईल.कार्यक्रमाला बडनेराचे आमदार रविभाऊ राणा,संघटनेचे जनरल सेक्रेटरी कों के व्ही श्रीधरण(दिल्ली),फेडरेशनचे माजी अध्यक्ष कों बी जी ताम्हनकर( मुंबई), फेडरेशनचे अध्यक्ष कों डी के रहाटे(मुंबई),संघटनेचे प्रांतिय सचिव कों मंगेश परब( मुंबई),पोस्ट्मन संघटनेचे प्रांतिय सचिव कों बाळकृष्ण चाळके (मुंबई),आर एम एस संघटनेचे प्रांतिय सचिव कों डी एम सोनवणे( मुंबई),अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिल अध्यक्ष कों उदयन शर्मा ,ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेचे प्रांतीय सचिव कों जी डी गिरी इत्यादि प्रामुख्याने उपस्थित राहतील .
              या अधिवेशनात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कों के व्ही श्रीधरण सतत तीनही दिवस  उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अनेक महत्वाच्या व ज्वलंत प्रश्नांवर अद्ध्यावत माहिती देण्यात येईल .तसेच भविष्यातील चळवळी व आंदोलनाची दिशा देण्यात येईल ॰तरी संघटनेच्या सर्व सभासदांनी अधिवेशनास उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि तन मन धनाने सहकार्य करावे  .असे आयोजक समितीचे अध्यक्ष कों एल एम परिमल,उपाध्यक्ष मोहम्मद मुजीब ,सचिव वैभव कापसे  विभागीय सचिव ए आर पचपोर ,अध्यक्ष एम ई अडीकणे यांनी कळविले आहे .

No comments:

Post a Comment