टपाल कामगारांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
मोर्शी (वार्ताहर)-अमरावती विभागातील टपाल कामगारांचा बडनेरा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युंनियन ग्रुप सी च्या महाराष्ट्र मंडल अधिवेशनाचे औचित्य साधून हा बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात अमरावती विभागातील टपाल कामगारांनी नृत्य,गायन ,नाटक ,वर्हाडी कविता सादर केल्यात . कार्यक्रमात”हसवा फसवी “ही एकांकिका अचलपूरच्या टपाल कामगारांनी सादर केली .त्यामध्ये सौ प्रभा जोशी यांच्या दिग्दर्शनात जयंत गावपांडे,विजय धुमाळे ,जगन डांगे ,उन्मेष सगणे ,रूपाली गोंडचोर ,नम्रता बोंडे ,निकिता बोंडे यांनी भाग घेतला . तसेच अमरावती प्रधान डाकघर येथील सौ पुष्पा इंगळे ,कु अश्विनी गवई ,वृशाली अडसोड आणि सहकारी यांनी भाग घेतला .पथ्रोटचे उपडाकपाल वर्हाडी कवी विजय सोसे यांनी “पाऊस “आणि “धुयमाती”या कविता सादर केल्यात .कलावंतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आर जी मोडक ,मनोज कट्यारमल ,सौ मीरा शिवणकर,वैभव कापसे इत्यादींनी परिश्रम घेतले ॰
No comments:
Post a Comment